जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* ब्रेक दि चेन अंतर्गत आज विविध जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधित दरानुसार (पॉझिटिव्हीटी रेटनुसार) राज्य शासनाने विविध पाच स्तर निश्चित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर 4 चे निर्बंध लागू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत ‘स्तर 4’ चे निर्बंध जिल्ह्यात दिनांक 7 जून पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. यापूर्वी लागू असलेले निर्बंध 6 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. दिनांक 7 जून पासून लागू असणाऱ्या निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात म्हटले आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजले पासून ते दिनांक 15 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजलेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडील आदेशान्वये कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदीनुसार त्या त्या जिल्ह्यातील कोवीड बाधीत रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आले असून त्या त्या स्तरानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट हा 12.70 टक्के असून ऑक्जिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी 66.65 टक्के इतकी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शासनाकडील आदेशान्वये चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. त्यानुसार साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारास अनुसरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार दि. 7 जून 2021 रोजी पासून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा स्तर चारमध्ये समाविष्ट असल्याने मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायं. 5 वा. नंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापना – सर्व दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना – बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृहे – बंद राहतील. रेस्टॉरंट्स – फक्त पार्सलसेवा, घेवून जाणेसाठी आणि घरपोहोच सेवा सुरू राहतील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग – सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 वा. ते सकाळी 9 वा. पर्यंत सुरू राहतील. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. खाजगी आस्थापना, कार्यालये यांना सुट देणेत आलेली आहे. कार्यालयीन उपस्थिती, शासकीय कार्यालयेसहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) ही 25 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. खेळ – मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 वा. ते सकाळी 9 वा. पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार बंद राहतील. चित्रिकरण – सोमवार ते शुक्रवार सायं.5 पर्यंत सुरक्षीत आवारणामध्ये (बबल) ज्यात गर्दी होईल असे चित्रिकरण प्रतिबंधीत असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी चित्रिकरण करता येणार नाही. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, करमणूकीचे कार्यक्रम, मेळावे – बंद राहतील. लग्नसमारंभ – जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत, अंत्ययात्रा, अंतविध – जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत, बैठका, निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा – 50 टक्के क्षमतेसह, बांधकाम – ज्या ठिकाणी कामगारांना राहणेची सोय असेल अशी बांधकाम सुरू राहतील. कृषि व कृषि पूरक सेवा – सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वा पर्यंत सुरू राहतील. ई – कॉमर्स – वस्तू व सेवा – फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई – कॉमर्स सेवा सुरू राहतील. जमावबंदी, संचारबंदी – संचारबंदी, व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर – 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वा. ते दुपारी 4 वा. पर्यंत सुरू राहतील. सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पूर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरू न करण्याच्या अटीवर सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) – 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील ( प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.), माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक, मदतनीस, स्वच्छक किंवा इतर) प्रवाशआंना लागू असलेल्या सर्व नियमांसह
