बंदीतही परजिल्ह्यतील १०१८ नागरिक सिंधुदुर्गात दाखल

खारेपाटण चेक पोस्ट येथे वाहनांची कडक तपासणी

*💫कणकवली ०६-:* कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जिल्हा सीमा १ जूनपासुन बंद केल्या होत्या.जिल्हा सीमा बंदीच्या आदेशा नंतर देखील खारेपाटण चेकपोस्ट येथून ५ जून २०२१ पर्यंत सलग पाच दिवसात सुमारे १०१८ परजिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती खारेपाटण येथील आरोग्य व महसुल पथकाने दिली. खारेपाटण चेक पोस्ट येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्यावर सध्या जिल्ह्यात दाखल होणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी सांगितले. खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे,सुयोग पोकळे खारेपाटण चेक पोस्ट येथे कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कायदा व्यवस्था चोख राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. खारेपाटण चेकपोस्ट येथे महसूल व आरोग्य पथकात अविनाश मांजरेकर,के. इ.शंकरदास,आर.जी.सावंत,व्ही एन मेस्त्री,पी एन काणेकर इत्यादी हायस्कुल शिक्षक व डॉ.सीमा अतिग्रे,आरोग्य सेवक गणेश तेली हे काम करत आहेत.तर ऑनलाइन नोंदणीचे काम प्राथमिक शिक्षकांचे महसुली पथक काम करत असून खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावनकर व त्यांचे सहकारी शिक्षक काम करत आहेत. खारेपाटण चेक पोस्ट येथे जिल्हा बंदी नंतर एकूण ११७७ प्रवासी वर्गाची ये जा झाली आहे. यापैकी सुमारे १०४८ प्रवासी वर्गाची तसेच नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून यापैकी फक्त १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. असल्याची माहितीखारेपाटण चेक पोस्ट येथे आरोग्य पथकात कार्यरत असलेल्या डॉ.सीमा अतिग्रे यांनी दिली.

You cannot copy content of this page