*न्हावेलीतील युवकांचे जनसेवच्या दिशेने उचललेले पाऊल कौतुकास्पद*
*💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड झोन यात समावेश झाला आहे. याचा विचार करत सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील तरुण वर्गाने एकत्र येत गावातील सर्व व्यक्तींचा जीवन विमा मोफत स्व-खर्चाने करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुण वर्गाने जनसेवच्या दिशेने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यात काही लोक रोजनदारी करून कुटुंब चालवतात. यातच कोरोना या संससर्गजन्य रोगामुळे त्यांना जीव गमवावा लागला, अशा कुटूंबाचा कमवता व्यक्ती गेल्याने काही कुटूंब रस्त्यावर आली आहेत, एखाद्या कुटुंब प्रमुखाचे कोरोनामुळे अचानक जाण्याने त्या कुटुंबावर होणाऱ्या मानसिक परिणामा बरोबर आर्थिक परिणाम याचा विचार करत न्हावेलेतील तरुण वर्गाने एकत्रीत येत गावातील सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा मोफत जीवन विमा करण्याचा ठरवले आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च हे युवक स्व-खर्चातून करणार आहेत. भविष्यात कुटूंबातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यास कुटूंबाला आधार मिळावा व आर्थिक अडचण दूर व्हावी या उद्देशाने या तरुण वर्गाने उचलेले हे पाऊल खरोखरच मोलाचे आहे. उद्या जुनपासून गावातील प्रत्येक वाडीमध्ये विम्याचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, हे अर्ज भरण्यासाठी विमा धारकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
