११० नागरिकांना देण्यात आला पहिला डोस
*💫सावंतवाडी दि०५-:* तालुक्यातील वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या पहिल्या डोसच्या लसीकरणाचा शुभारंभ काल दिनांक ४ जुन रोजी सरपंच सौ. स्नेहा मिठबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे. वेत्ये गावात कोरोनाचा होणार प्रादुर्भाव लक्षात घेता ४५ वर्षांवरील नागरिकांना काल पहिला डोस देण्यात आला आहे. यावेळी गावातील लोकांनी या लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला आहे. यावेळी लस घेतलेल्या व्यक्तीस सरपंच स्नेहा मिठबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर यांनी पाणी बॉटल आणि बिस्कीट वितरित करण्यात आले आहे. यावेळी गावातील ११० लोकांना लस देण्यात आली आहे. यावेळी लस घेतलेल्या नागरिकांनी पुढील दोन दिवस स्वतःची काळजी घ्यावी आणि घरीच आराम करावा असे आवाहन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
