*💫वैभववाडी दि.०४:-* वैभववाडी तालुका वनविभागाचे वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून नावळे गावात साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाच्या कणकवली वनपरिक्षेत्रामार्फत ठीक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वैभववाडी तालुक्यात ग्राम पंचायती,शासकीय कार्यालये, राजकिय पक्ष अशा विविध स्तरावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंबा,काजू,फणस व अन्य जंगली झाडांच्या रोपांचे ठीक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वनक्षेत्रपाल रा. ध. घुणकीकर, करूळचे माजी सरपंच रमेश पांचाळ,करूळ तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार प्रमुख पाहुणे उपास्थित होते. सरकारी जमिनीमध्ये काजू व फणसाचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वैभववाडी वनपाल सदाशिव वागरे, वनरक्षक अमीर काकतीकर, वनरक्षक कि. ग. पाटील, उ. शं. कांबळे, श्री. लोखंडे, वनमजुर मराठे, वनमजूर पाताडे तसेच करूळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वैभववाडी वनविभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा…
