⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील हळवळ येथील ग्रामदेवता श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा ११ वा वर्धापन दिन मंगळवार, ५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने होणार असून सकाळी ७ वाजता देवाची पूजा व अभिषेक, सकाळी १० वाजता सामूहिक आरती आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारनंतर ३ ते ६.३० या वेळेत शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यामध्ये बाल दशावतार नाट्यप्रयोग हे खास आकर्षण ठरणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता हरिपाठ (वारकरी संप्रदाय, हळवळ), तर रात्री ७.३० वाजता प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता महाप्रसाद होणार असून रात्री १० वाजता गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, हळवळ यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग रंगणार आहे.
