⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे आज भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीची प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान “वंदे मातरम्”, “जय भवानी जय शिवाजी”, “भाजप पक्षाचा विजय असो” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. महायुतीच्या संपर्क कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, नेमळेचे माजी सरपंच विनोद राऊळ, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीप गावडे, मळगाव–नेमळे पंचायत समितीचे उमेदवार गौरव मुळीक, शक्ती केंद्रप्रमुख गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा विभागप्रमुख लक्ष्मण गावकर, माजी सरपंच निलेश कुडव, नीलकंठ बुगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, सदस्या निकिता राऊळ, अनुजा खडपकर, बूथ अध्यक्ष सुदेश राऊळ, मदन तेंडोलकर, रुपेश सावंत, सुभाष देवळी यांच्यासह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रचार फेरीतून महायुतीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मळगाव येथे भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची भव्य प्रचार फेरी…
