मळगाव येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन..

⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे भाजप, शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) यांच्या संयुक्त संपर्क कार्यालयाचे उदघाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात पार पडले.
यावेळी नेमळे येथील माजी सरपंच विनोद राऊळ, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुती उमेदवार संदीप गावडे, मळगाव–नेमळे पंचायत समितीचे उमेदवार गौरव मुळीक, शक्ती केंद्रप्रमुख गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा विभागप्रमुख लक्ष्मण गावकर, माजी सरपंच निलेश कुडव, नीलकंठ बुगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, सदस्या निकिता राऊळ, अनुजा खडपकर, बूथ अध्यक्ष महेश गवंडे, सुदेश राऊळ, मदन तेंडोलकर, रुपेश सावंत, सुभाष देवळी यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदघाट्नप्रसंगी बोलताना अनिल निरवडेकर म्हणाले की, भाजप पक्षामध्ये शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यालाही पक्षात सन्मान व संधी मिळते. येथील दोन्ही महायुतीचे उमेदवार उच्च शिक्षित असल्याने त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तळवडे जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे यांनी प्रचारासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांचे आभार मानले. तसेच संपर्क कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाश सबनीस यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page