बंडखोरी, विरोधी उमेदवाराला मदत भोवली….

भाजपचे २३ जण निलंबित:जिल्हाध्यक्ष सावंत यांची कारवाई: राजेंद्र मापसेकर, मायकल डिसोझा, शर्वाणी गावकर, रुपेश पावसकर यांच्यासह अन्य जनांचा समावेश..

ओरोस ता २९
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे. विरोधी उमेदवाराला मदत करणे अश्या प्रकारच्या पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २३ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे. राजेंद्र म्हापसेकर, मायकल डिसोझा, शर्वाणी गांवकर, रुपेश पावसकर, योगेश तावडे आदी बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.
५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३१ जागा भाजप, १९ जागा शिवसेना लढत आहे. तसेच पंचायत समितीच्या ६३ भाजप आणि ३७ शिवसेना जागा लढवित आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना इच्छा असूनही पक्षाकडून तिकीट मिळू शकलेली नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली. काहींनी पक्ष आणि महायुतीचा धर्म पाळत शांत बसण्याचा पर्याय निवडला.
जिल्हाध्यक्ष सावंत यांनी निलंबित केलेल्या कारवाईत माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, नेरूर देऊळवाडा येथे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्या रुपेश पावसकर, जिल्हा परिषद माजी सदस्य वंदना किनळेकर, कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेले डायगो (मायकल) डिसोजा, जिल्हा परिषद माजी सभापती शर्वाणी गांवकर आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
तसेच अन्य निलंबित मध्ये राजन चिके, फोंडा ता. कणकवली, सुजाता पडवळ, तुळस ता. वेंगुर्ला, विजय रेडकर, मातोंड ता. वेंगुर्ला, जनार्दन कुडाळकर, आडेली ता. वेंगुर्ला, जितेंद्र गावकर, माजगाव ता. सावंतवाडी, योगेश केणी, इन्सुली ता. सावंतवाडी, स्वागत नाटेकर इन्सुली ता. सावंतवाडी, नितीन राऊळ इन्सुली ता. सावंतवाडी, उल्हास परब सातार्डा ता. सावंतवाडी, स्नेहल नेमळेकर आरोंदा ता. सावंतवाडी, साक्षी नाईक ता. दोडामार्ग, सुप्रिया नाईक ता. दोडामार्ग, सुनीता भिसे ता. दोडामार्ग, प्रवीण गवस ता. दोडामार्ग, अनिरुद्ध फाटक ता. दोडामार्ग, सोष्मिता बांबर्डेकर ओरोस ता. कुडाळ, योगेश तावडे ओरोस ता. कुडाळ, विजय नाईक आडेली ता. वेंगुर्ला यांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page