⚡वेंगुर्ला ता.२९-: तालुक्यातील उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघाचे ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय दत्ताराम गावडे व पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार गंधाली तांडेल यांच्या प्रचाराचा शुभारंभ उभादांडा – मूठ येथील श्री
केपादेवी मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आला.यावेळी दोन्ही उमेदवार, अणसुर गावकर चंद्रकांत गावडे, केपादेवी गावकर बाळू गावकर, उदय गावडे, सुधीर डिचोलकर, सुजित चमणकर, गावकर सुंदर परब, बाळू साळगावकर, महिला तालुकाप्रमुख साक्षी चमणकर, राजश्री मर्ये,
लक्ष्मी पेडणेकर, नम्रता कुर्ले, दीपा पेडणेकर, दादा पेडणेकर, अभिमन्यू भुते, बाळू धुरी, नंदन वालावलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उभादांडा जि. प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ…
