“कोलगाव जि.प. व पं.स. महायुतीचा प्रचार शुभारंभ…

अफवांवर विश्वास ठेवू नका: कोलगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला साथ द्या; महेश सारंग यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२८-: कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार महेश सारंग, व कोलगाव पंचायत समितीच्या उमेदवार संध्या हळदणकर यांनी बुधवारी येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर, श्री देवी सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवत आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका , कोलगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुतीला साथ द्या, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस व उमेदवार महेश सारंग यांनी केले. यावेळी सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, मानकरी चंदन धुरी, वीरेंद्र धुरी, गोपाळ नाईक, बळवंत कुडतरकर, दिपक डांबरेकर, राजन चेंदवंणकर, राजन राऊळ, राजा चव्हाण, संदीप हळदणकर, बाळा राऊळ, भावेश राऊळ, पंढरी सावंत, बाबू करमळकर, विशाल पालव आदी कोलगाव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page