विशाल परब: अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली..
⚡सावंतवाडी, ता.२८-:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक कर्तबगार आणि मेहनती व्यक्तिमत्त्व होते. प्रशासकीय कामकाजाची त्यांना सखोल जाण होती. गरीब व वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची असलेली तळमळ विशेष उल्लेखनीय होती, अशा शब्दांत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी असल्याची भावना विशाल परब यांनी व्यक्त केली. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावला असल्याचे त्यांनी सांगितले.
