⚡सावंतवाडी ता.१७-: आजगाव (पांढरेवाडी) येथील श्री अग्निवेताळ देवाचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दिनांक २९ जानेवारी रोजी होत असून,मंदिरात सकाळी ८:०० वाजता सर्व देवतेवर महाअभिषेक व शाश्वत पुजा, सकाळी ९:०० वाजता केळी मानवणे ,ओटी भरणे ,नवस बोलणे व फेडणे, दुपारी १२:०० वाजता महाआरती व महागाऱ्हाणे, दुपारी १:०० वाजता. महाप्रसाद तसेच रात्रौ ११ वाजता फटाक्यांची आतषबाजी व श्रीं ची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, तद्नंतर. श्री देव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर ( कुडाळ ) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या जत्रौत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव अग्निवेताळ देवस्थान कमिटी आजगांव-पांढरेवाडी, ग्रामस्थ यांनी केले आहे.
आजगाव येथील श्री अग्निवेताळ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २९ रोजी ..
