सुदैवाने जिवीतहानी नाही:गाड्यांचे नुकसान..
⚡मालवण ता.०४-:
कणकवली आचरे मार्गांवरील श्रावण गवळीवाडी येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत आचरा पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार कणकवली देवगड गाडीचे चालक अमित प्रकाश पाटील( वय ४५ ) रा.देवगड विठ्ठलवाडी हे एसटी बस ( क्रमांक एम एच 20 बी एल 4107 ) कणकवली ते देवगड अशी चालवीत घेऊन जात असताना श्रावण गवळीवाडा येथील चढावाच्या वळणावर रस्त्यावर एस टीचे (बस नंबर एम एच 14 बी टी 5857 ) चालक पंढरीनाथ बाबू फाले (वय 40) रा.वैभववाडी सांगुळवाडी यानी आपल्या ताब्यातील मसुरे बांदिवडे कणकवली एसटी बस भरधाव वेगात रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी अविचाराने व हयगईने चालवून समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली
याबाबत बेळणा दूर क्षेत्र येथे गाडीचे चालक अमित प्रकाश पाटील यांनी तक्रार दाखल केली.
अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शना खाली बेळणे दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार उत्तम वंजारे व सहकारी पोलीस नाईक करवंजे हे करत आहेत.
