युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये…

कणकवली ता २८-:कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार महादेव सोगम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंडू गांगण, सुशील दळवी, संजय ठाकूर, माजी नगरसेविका मेघा गांगण, यांच्यासह अन्य उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांनी सोगम यांचे स्वागत करत शहरात भाजप वाढी सोबत निवडणुकीत गाफील राहू नका अशा सूचना दिल्या.

You cannot copy content of this page