गोर गरीब जनतेचे परिवर्तन करण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो…

विशाल परब: सावंतवाडीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज…

⚡सावंतवाडी ता.२८-: गोर गरीब जनतेचे परिवर्तन करण्यासाठीच मी आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, मी या मतदार संघात नक्कीच परिवर्तन घडवून आणणार फक्त तुम्ही तुमचे आशीर्वाद ठेवा अशी आर्त हाक विशाल परब यांनी आज जमलेल्या जनसमुदायाला मारली आहे. विशाल परब आज विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, मला कोणत्याही स्टार प्रचारकाची गरज नसून, ही माझ्यासाठी ईथे जमलेली माझी जनता, हे युवक आणि ही मुलेच माझे स्टार प्रचारक आहेत. असे भावनिक मत व्यक्त केले. या मतदारसंघात बदल घडवायचे असतील , येथील युवकांना इथेच रोजगार मिळवायची असतील तर मला साथ द्या अशी साद त्यांनी जमलेल्या नागरिकांना घातली आहे.

You cannot copy content of this page