महायुतीचे उमेदवार निलेश राणे व नितेश राणे आज उमेदवारी अर्ज करणार दाखल…

दोघांच्याही विजयासाठी खा. नारायण राणे यांनी घातले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण ला साकडे; सपत्नीक घेतले दर्शन..

⚡मालवण ता.२८-: मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार व आमदार नितेश राणे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आज वाजत गाजत मिरवणूकीने जात मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- श्री देव नारायण यांचे सपत्नीक दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे व आम. नितेश राणे यांच्या विजयासाठी साकडे घातले. यावेळी त्यांच्या समवेत सौं. नीलमताई राणे, सौ. प्रियांका राणे, कु. अभिराज राणे, भाजपचे अशोक सावंत, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, सुधीर साळसकर, हरीश गावकर, शिवसेनेचे विश्वास गावकर, महेश कांदलगावकर, जगदीश गावकर, आनंद गावकर, रवी मालवनकर, नीलम शिंदे,नारायण धुरी,विक्रांत नाईक, आबा हडकर, दिलीप बिरमोळे,आपा लुडबे,बबन शिंदे, अशोक तोडणकर,नारायण लुडबे यांच्यासह भाजप व शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page