Headlines

हर्षदा पवार हिची राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड…!

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची महाराष्ट्रातर्फे दि. ३ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत केरळ तिरुवंतपुरम या ठिकाणी होणाऱ्या XXXIII G.V. ऑल इंडिया रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हर्षदा पवार हिच्या या निवडीबद्दल ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांनी हर्षदाचा पदक आणि प्रमाणपत्र देउन सत्कार केला. यावेळी सिंधुदुर्ग कॉलेजचे एनसीसी मार्गदर्शक लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, हर्षदाचे वडील दादा पवार, आई सौ. ज्योती पवार आदी उपस्थित होते.

हर्षदा पवार गेली दोन वर्षे ५८ महाराष्ट्र बटालियन बटालियन ओरस या ठिकाणी सातत्याने रायफल शूटिंग सराव करत असून तिच्या सरावाचा, भारतभर स्पर्धेसाठी जाण्याचा खर्च महाराष्ट्र बटालियन व आर्मी करत आहे, असे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांनी सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या एनसीसीचा फायदा घ्यावा, असेही सांगितले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देश पातळीवर नेण्यासाठी कर्नल दीपक दयाल आणि त्यांचा सर्व आर्मी स्टाफ सिंधूदुर्ग कॉलेजला सातत्याने मदत करत असल्याबद्दल लेफ्टनंट प्रा. खोत आणि कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी कर्नल दीपक दयाल यांचे आभार मानले.

हर्षदा हिच्या यशाबद्दल कर्नल दीपक दयाल यांच्यासह एनसीसी मार्गदर्शक लेफ्टनंट प्रा. डॉ. एम आर खोत, प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, कृ. सी .देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सेक्रेटरी गणेश कूशे, सीडीसी अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, संचालक साईनाथ चव्हाण संदेश कोयंडे, विजय केनवडेकर, प्रमोद ओरसकर, डॉ. शशिकांत झाट्ये, भाऊ सामंत, महादेव पाटकर, इतर सर्व संस्था पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page