चिवला बीच येथे स्कुबा ‘दर’ निश्चित

स्थानिक स्कुबा व्यवसायिकांचा एकमुखी निर्णय..

⚡मालवण ता.२६-: पर्यटन नगरी मालवणमध्ये सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिवला बीच येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक सुरक्षित आणि दर्जेदार पर्यटन सफर घडवण्यासाठी तेथील स्थानिक स्कुबा व्यवसायिकांनी एकत्र येत स्कुबा सागरी सफर ‘दर’ निश्चितीचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मालवण किनारपट्टीवर दरवर्षी लाखो पर्यटन भेट देतात. मालवण शहरातील चिवला बीच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि दर्जेदार सागरी पर्यटन सफर घडवण्यासाठी येथील स्कुबा व वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक सेवा देत असतात. यामध्ये आणखी एक पाऊल पुढे जाऊन चिवला बीच येथील पर्यटन व्यवसायिकानी एकत्र येत स्कुबा दर निश्चित केला आहे. याठिकाणी स्कुबाचा एकच असला तर पर्यटकांमध्येही गैरसमज राहणार नाही. निश्चित दरामुळे सेवेचा दर्जाही उच्चतम ठेवून सर्वोत्तम सेवा पर्यटकांना देता येईल, असे यावेळी उपस्थित व्यवसायिकानी सांगितले.

यावेळी पर्यटन व्यावसायिक मनोज मेथर, स्वीटन सोज, विशाल गोवेकर, रोहित मेथर, जॉन्सान रॉडरिक्स यांसह इतर व्यावसायिक व स्थानिक स्कुबा गाईड उपस्थित होते.

You cannot copy content of this page