पत्रकार परिषदेत दिली माहिती:संजय राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार..
⚡कणकवली ता.२६-: कणकवली मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ठाकरे शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती स्वतः संदेश पारकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान यावेळी उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊत, खासदार अरिंवद सावंत,अनिल परब, यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
तरी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पारकर यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले सगळ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मी उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या विश्वासाला न्याय देण्याच प्रयत्न करणार असा विश्वसास ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख तथा कणकवली ठाकरे सेनेच उमेदवार संदेश पारकर यांनी सांगितले.
