शिंदे गट जिल्हाप्रमुख यांनी संजू परब यांचे पुष्पगुच्छ देवून केले पक्षात स्वागत…

दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आखण्यात आली रणनीती…

सावंतवाडी ता.२४-:संजू परब यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिंदे गटाचे पदाधिकारी व केसरकर समर्थकांनी आज संजू परब यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी संजू परब व शिंदे गटाचे पदाधिकारी यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली असून, दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी रणनीती आखण्यात आली. संजू परब यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.

You cannot copy content of this page