⚡सावंतवाडी ता.११-: अक्षय साईलच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक केल्यानंतर महेश सारंग यांनी उद्या पुकारलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर सहआरोपींना लवकरात लवकर अटक होण्याच्या दृष्टीने व तपासात सहकार्य करण्याच्या हेतूने तुर्तास आपले उपोषण स्थगित करत असल्याची माहिती महेश सारंग यांनी दिली आहे, याबाबतची लेखी माहिती सावंतवाडी पोलीस स्थानकात पञकातुन दिली.
याबाबत पञकात असे म्हटले आहे की, कोलगांव गावात राहणारा कु. अक्षय जगन्नाथ साईल या युवकाने माडखोल धरणात उडी टाकून आत्महत्या केल्या प्रकरणी चौकशी दरम्याने त्याने मरणापूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठी मधील त्याचे मरणास कारणीभूत असलेल्या इसमांविरूद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. परंतु मयत अक्षय याचे मृत्यूस कारणीभूत असलेले मुख्य आरोपी नजरेआड असल्याने व तपासात पोलीसांना मिळून येत नसल्याने आम्ही 12 रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता परंतु मुदतीत दि. 10 रोजी नमूद प्रकरणातील मुख्य आरोपी यांना पोलीसांकडून अटक करण्यात आलेली असल्याने त्याच प्रमाणे गुन्हाचे तपासिक अधिकारी यांनी तपासा बाबत आम्हांस योग्य अशी माहिती दिल्यानंतर गुन्हाचा तपास योग्य दिशेने होत असल्याचे आमची खात्री झाल्याने योग्य दिशेने होत असलेल्या तपासात कोणताही अडथळा येवू नये व उर्वरित आरोपी यांना देखील मुदतीत ताब्यात घेवून गुन्हाचा सखोल तपास व्हावा या करीता आम्ही आमचे दिनांक 12 रोजीचे उपोषण तूर्तास स्थगित करीत आहोत असे म्हटले आहे.
