धनगर समाज विचार मंच चा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ रोजी…

वैभववाडी प्रतिनिधी
धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे ता. कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२२३ व २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षात १०वी,१२वी, पदवी,पदव्यूत्तर परीक्षा उत्तीर्ण व स्पर्धा परीक्षा गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी एक तास आधी नाव नोंदणी करण्यात येईल. तरी धनगर समाजातील पात्र जास्तीत जास्त मुलांनी, पालकांनी व समाज बांधवांनी उपस्थित रहावे अधिक माहितीसाठी सचिव एकनाथ जानकर यांचेशी 8275390680 नंबरवर संपर्क करावा. असे आवाहन धनगर समाज विचारमंचचे अध्यक्ष आर. डी. जंगले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page