मायकल डिसोजा यांची टिका:कोणतीही मदत न करणारे केसरकरांकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला मदत करण्यासाठी आता पैसा कुठून आला…?
⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघचे आमदार तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा 15 वर्षाच्या कारकीर्द निष्पळ व निष्क्रिय असे ठरली आहे, कोणतेही ठोस काम करू न शकलेले असे हे पंधरा वर्ष आमदार व साडेसात वर्ष मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत, यामुळे त्यांचे मित्रपक्षचे सर्व नेते त्यांच्यावर तुटून पडत आहेत. अशी टीका ठाकरे सेनेचे नेते मायकल डिसोजा यांनी आज येथे केली.दरम्यान सर्वसामान्यांना मदत करते वेळी कायम जमीन विकतो व राजकारण करतो असे रडत राहणारे व कधीच कोणतीही मदत न करणारे आमदारकीची निवडणूक जवळ आली की कशी काय मदत करतात व पैसा कुठून जमा करतात एक संशोधनाचा विषय आहे. असा सवाल श्री मायकल डिसोजा यांनी यांनी यावेळी उपस्थित केला
याबाबत त्यांनी निवेदन दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की
जमीन विकून राजकारण करतो असे कायम ओरडणारे ह्या वेळी स्वतःची कोणती जमीन विकली ती आताच जाहीर करावी, कारण या विधानसभा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकणार आहे, निष्क्रिय आमदार केसरकर यांचा पराभव आता नक्कीच सर्वसामान्य जनता करणार आहे. मागील काही काळामध्ये सावंतवाडी मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी व इतर गुन्हेगारी कृत्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे यात शासन म्हणून दीपक केसरकर कोणताही अंकुश नाही, हल्लीच कोलगाव मध्ये झालेल्या अक्षय साहिल यांच्या आत्महत्या संदर्भात मागील आठ दिवसापासून आरोपी अटक होत नाही, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्यांना जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा, ह्यातून हे सिद्ध होतंय की आमदार दीपक केसरकर यांच्या प्रशासनावर कुठलाही अंकुश नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली तर प्रकरणात जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या घरासमोर व सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील मायकल डिसोजा यांनी यावेळी दिला आहे.
