बबन साळगावकर:येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांचा माज उतरवल्या शिवाय गप्प बसणार नाय..
⚡सावंतवाडी ता.११-: निवडणुकीच्या तोंडावरती बैठकांची नाटक शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंद करावीत अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान ज्या माणसाला सर्वसामान्य माणसं भेटायला आल्यानंतर ही वेळ मिळायचा नाही माझं फ्लाईट चुकतंय मला जायचं आहे अशी कारण देऊन निघून जाणारी अभ्यंकर न भेटणारे दीपक केसरकर हे आज बैठकांच्यावरती बैठका घेत आहेत ही सगळी नाटकं जनता ओळखू आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
ते पुढे म्हणाले केसरकर कुठच्याही गावात एक तास गेल्या पंधरा वर्षांमध्ये थांबू शकलेले नाहीत सर्वसामान्य नागरिकांना दुर्लक्षित केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा केसरकरांचा माज उतरवल्या शिवाय गप्प बसणार नाय.तर निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या महिन्यात बैठका घेत आहेत पंधरा वर्षे काय झोपला होता..? व्यापारी संकुलातील भाडे आकारणी निर्णयाची बैठक घेऊन केसरकर निवडणुकीच्या तोंडावर नौटंकी करत आहेत. त्यामुळे पुढील वीस वर्षांतही सावंतवाडी शहरातील व्यापारी कॉम्प्लेक्स उभे राहू शकणार नाही असेही श्री साळगावकर यांनी यावेळी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
