मळगावात रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद…

भिल्लवाडी गृप व मळगाव ग्रामस्थ यांचा स्तुत्य उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.११-: येथील भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला नागरिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे,
रक्तदान शिबीराचे यंदाचे दुसरे वर्ष होते. नेहमी सामाजिक, कला, क्रिडा कार्यातून लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात भिल्लवाडी गृप व या गृपचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊळ हे पुढाकार घेत असतात.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील , ग्रामीण भागातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास 50 नागरीकांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले व आयोजकांना शुभेच्छा देण्यात आल्या…
यावेळी भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ व त्यांचे सर्व सहकारी तसेचं मळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page