आंबोली- चौकुळ- गेळे जमिनीचा प्रश्न वन ३५ सेक्शन ची चौकशी पूर्ण…

मंत्री दीपक केसरकर:सावंतवाडी शहरात विकासात्मक कामे होणार..

⚡सावंतवाडी ता.१०-: आंबोली चौकुळ गेळे हा जमिनीचा प्रश्न वन ३५ सेक्शन ची चौकशी पूर्ण झाली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही नोंद हटवण्याच्या संदर्भात आपले टीम कार्यरत केली आहे त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर चौकूळ गावाचा स्वतंत्र जीआर आचारसंहितेपूर्वी काढला जाणार आहे असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री केसरकर म्हणाले आज या चौकूळ गावची बैठक झाली या बैठकीत त्यांनी एकमेकांनी निर्णय घेतला आहे ते सर्व माझे आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न मी लवकर सोडवणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिक्षण विभागात नवनवीन बदल केले जाणार आहेत भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल संदर्भात युवराजनी यांची सही व्हायचे आहे ती सही एक-दोन दिवसात झाल्यावर हा प्रश्नही सुटेल तसेच सावंतवाडी शहरात विकासात्मक कामे होणार आहेत असेही ते म्हणाले. जर्मन येते नोकरी प्रक्रिया चा पायलेट प्रोजेक्ट सुरू आहे त्यात तरुणांनी सहभाग घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. मी गेली वीस वर्षापासून शिधावाटप व भजन साहित्य वाटप करत आहे त्यामुळे माझ्या विरोधात कोणी षडयंत्र रचत आहे त्यांच्या संदर्भात मी जास्त पाहत नाही असे ते म्हणाले

You cannot copy content of this page