विश्वास तानावडे यांचे रत्नागिरी येथे निधन

*💫सावंतवाडी दि.०८-:* भटवाडी येथील विश्वास शंकर तानावडे वय 76 यांचे रत्नागिरी येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.उभा बाजार येथील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स चे मालक वैभव तानावडे यांचे ते वडील होत.

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ५३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

हिवाळे प्रा.आ.केंद्राला आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर…

आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिरवंडेतील रुग्णांसाठी तातडीने औषध पुरवठा *💫मालवण दि.०८-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून याठिकाणी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लवकरात लवकर हि मागणी पूर्ण करण्याची…

Read More

पंछी बनो उडते फिरो… आमदार दीपक केसरकरांचा शिरोड्याच्या डोक्यावरून उडता दौरा – ग्रामस्थ ताळकळत!!

*शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची नाराजी *💫वेंगुर्ले दि.०८-:* आमदार दीपक केसरकरांचे शिरोड्यावरचे प्रेम कमी झाले, यामागे आमची काहीतरी चूक नक्की असेल. पण तो राग एवढा पण असू नये की एक लोकप्रतिनिधी म्हणून शिरोडा गावही आपल्याच मतदारसंघात येते हे ही विसरून जावे. केसरकर महान आहेत. स्वतः येत नसतील तर निदान उडत्या दौऱ्यात त्यांची सावली तरी शिरोड्यावर…

Read More

नाटळ जि. प.मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत:आम.नितेश राणे

मोफत कोविड सेंटर व ग्राम विलगीकरण कक्ष उद्धाटन समारंभ *💫कणकवली दि.०८-:* कोरोना रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे व्हावेत आणि कोरोना हद्दपार व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.कोरोना रुग्णांसाठी सर्व सुख सोई उपलब्ध करून देणारे नाटळ जिल्हा परीषद मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत आहे असे उदगार आम. नितेश राणे यांनी काढले. जि प…

Read More

नेमळेतून सावंतवाडीत येऊन तालुकाप्रमुख बनलेल्या रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव घेऊन शहराची बदनामी करू नये

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा टोला *💫सावंतवाडी दि.०८-:* नेमळे येथून सावंतवाडीत येऊन सेना तालुकाप्रमुख बनलेल्या रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी शहराची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, काल पालिकेला मिळालेले राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस हे रुपेश राऊळ यांना सणसणीत चपराक असल्याचा टोला आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या वादात विनाकारण नगराध्यक्ष…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६५५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २३ हजार ७७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६५५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही:संदेश पारकर

*💫कणकवली दि.०८-:* पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून खनिकर्म विभागामार्फत वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्य अशी रुग्णवाहिका आज मिळाली आहे. या रुग्णवाहिकेचा फायदा जवळच्या सर्व गावांना होणार असुन रुग्णांना अधिक जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला यापुढेही लागेल तेवढा निधी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत…

Read More

वडाचापाटसाठी निधी कमी पडु देणार नाही…

आमदार वैभव नाईक;ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न *💫मालवण दि.०८-:* वडाचापाट ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक याच्या उपस्थितीत संपन्न झाले. वडाचापाट गावच्या विकासासाठी लागणारा निधी यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, विभाग प्रमख विजय पालव,युवा उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम ,वडाचापाट उपसरपंच तथा पोईप विभाग…

Read More

*कुडाळ महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी आ. वैभव नाईक यांच्यातर्फे ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने

*कोविड रुग्णांना होणार लाभ *💫कुडाळ दि.०८-:* कुडाळ येथील महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने तब्बल ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने देण्यात आली आहेत. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हि इंजेक्शने रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आली.याचा कोविड रुग्णांना लाभ होणार आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध…

Read More
You cannot copy content of this page