आमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला…

नवीन रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची केली पूर्तता_

*💫कुडाळ दि.०८-:* आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज माणगाव व चौके प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तसेच कुडाळ महिला बाल रुग्णालय येथील कोविड केअर सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नुकतेच कुडाळ महिला बाल रुग्णालय येथील कोविड केअर सेंटर, मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटर, माणगाव, चौके प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला होता. याठिकाणच्या समस्या तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या होत्या. रुग्णालयांच्या आवश्यकतेनुसार नवीन रुग्णवाहिका व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून नवीन रुग्णवाहिका व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पूर्तता करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हिवाळे, मसुरे, वालावल, पणदूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page