खा.सुरेश प्रभू यानी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष
*💫सावंतवाडी दि.०८ प्रसन्न गोंदावळे:-* महाराष्ट्र शासनाने १८ते ४४वयोगटासाठी लसीकरण चालू केले आहे पण पहिला डोस घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस घेण्याची तारिख येऊनही त्यांना दुसरा डोस मिळत नाही त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्र लिहून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.