राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले मत*
*💫सावंतवाडी दि.०८-:* जिल्ह्यात रुग्ण संख्येबरोबरच मृत्युदर देखील वाढत आहे. त्याच्या तुलनेत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. हे महाभयंकर संकट जागतिक असून, त्याला रोखण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही आहे. परंतु या काळात देखील केले जाणारे राजकारण हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले आहे. या काळात एकमेकांवर टीका टीपणी करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच लोकप्रतिनिधी नी देखील शक्य होईल तेवढे सहकार्य सरकारी यंत्रणेला करावे असे आवाहन देखील पुंडलिक दळवी यांनी केले आहे.