*शिवसेना महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे यांच्या पाठपुराव्याला यश*
*💫सावंतवाडी दि.०८-:* कोरोना या महाभयंकर आजाराच्या काळात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता राज्य सरकार कडून राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेच्या सर्वेक्षणासाठी आशा ताई काम करत असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या आशा ताईंना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच त्यांना त्याचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात यावे यासाठी आवश्यक ते साहित्य मिळावे यासाठी सावंतवाडी तालुका शिवसेना महिला संघटक अपर्णा कोठावळे यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री दिपक केसरकर याना निवेदन सादर करत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, पालकमंत्री उदय सामंत यांनी आशा ताई यांच्या मानधनात ५०० रुपयांनी वाढ केल्याचे जाहीर केले आहे. तर त्यांना सुरक्षिततेसाठी योग्य ते साहित्य देखील पुरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अपर्णा कोठावळे यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे. यावेळी त्यांच्यासह गायत्री कांडारकर, अपर्णा राऊळ, सरोज पाटणकर, दर्शना सावंत, अनुष्का गोवेकर, सुजाता धुरी, गायत्री मयेकर, सावली सावंत या आशाताईंनी देखील त्यांना साथ दिली होती.