⚡मालवण ता.२३-:
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे या प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि पालक मेळावा संपन्न झाला.
यावेळी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पालक मेळाव्याचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी वर्षभरातील शाळेने आणि संस्थेन राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थी प्रगतीमध्ये पालकांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन करून शालेय समस्या सोडविण्यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. तर्फे यांनी केले. या कार्यक्रमात शालेय समिती सदस्य चंद्रकांत गांवकर व कैलास घाडीगांवकर यांनी सर्व मुलांना पेन वाटप केले. शालेय समिती अध्यक्ष आणि मेळाव्याचे अध्यक्ष सहदेव चव्हाण यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करत शालेय प्रगतीसाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी चंद्रकांत गांवकर, दिपक चव्हाण, दशरथ घाडीगांवकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी सहदेव चव्हाण व दिपक चव्हाण यांनी शाळेसाठी देणगी सुपूर्द केली.
यावेळी शिक्षक पालक संघ कार्यकारिणी, शाळा व्यवस्थापन समिती,परिवहन समिती, पोषण आहार समिती नियुक्त करण्यात आली. प्रशालेचे सहाय्य शिक्षक श्री. सावंत यांच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन श्री.काणेकर यांनी केले तर आभार एस. आर.सावंत यांनी मानले.
