बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी दहा टेबल भेट…

आमदार राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांचा पुढाकार..

⚡बांदा ता.२३-: भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा शहर भाजप व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांच्या पुढाकाराने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी दहा टेबल भेट देण्यात आली.
आज सकाळी हा कार्यक्रम आरोग्य केंद्रात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याकडे टेबल सुपूर्द करण्यात आली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, स्वप्नील सावंत, निलेश कदम, सुनील धामापूरकर, कैलास गवस, वाफोली उपसरपंच विनेश गवस, गुरुनाथ सावंत, सुधीर शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, शैलेश केसरकर, ज्ञानेश्वर सावंत, देवल येडवे, गुरु कल्याणकर, विलास पावसकर, दीपक सावंत, सिद्धेश महाजन, अक्षय परब, शुभम साळगावकर, प्रवीण नाटेकर, शिवनाथ मळेवाडकर, ऋषीकेश सावंत, बाळा आकेरकर, अभिजित देऊलकर, वसीम बुराण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page