सावंतवाडी ता.२३-: मुंबई -गोवा महामार्गावरील वेत्ये येथे ट्रक वरील ताबा सुटून डिवाइडरवर चढल्याची घटना घडली आहे . सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान हा ट्रक डिव्हायडर वरून काढण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली.
वेत्ये येथे ट्रक चढला डीव्हायडरवर…
