निरंजन डावखरे:कोकणामध्ये कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आपले प्रयत्न असणार..
⚡सावंतवाडी ता.२२-: कोकणात ग्रीन स्कूल संकल्पना राबविण्यात येणार आहे प्रत्येक शाळेमध्ये सोलर सिस्टीम लावण्यात येणार आहे असा संकल्प आहे तसेच कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आपले प्रयत्न राहतील असे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दरम्यान आपण पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना गेल्या सहा वर्षात कोकणातील सर्व शाळांमध्ये डिजिटल शाळा उपक्रम राबविला असल्याच देखील माझा सातत्याने सिंधुदुर्ग संपर्क आहे आता कोकणातील शाळा ग्रीन शाळा बनवायच्या आहेत तशी संकल्पना आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडी येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी नारायण राणे श्री रावराणे काका कुडाळकर आदी उपस्थित होते
ते म्हणाले प्रत्येक शाळेमध्ये सोलर सिस्टीम बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कोकणामध्ये कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत मात्र विद्यापीठ व्हावे यासाठी काही महाविद्यालयांचे मतमतांतरे आहेत, मात्र कोकणातील पदवीधरांना येथे रोजगार मिळावा यासाठी आपले प्रयत्न आहेत नीट व सीईटी परीक्षेत झालेला घोळ हा चुकीचा असून फेरपरीक्षा होणे योग्य नाही असेही ते म्हणाले. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले
