शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनच घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.२२-: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

मे २०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये तबला, हार्मोनियम आणि बासरी या वाद्यांच्या प्रारंभिक परीक्षेमध्ये प्रशालेच्या पुढील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये, तबला प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ३ री मधील कु. वल्लभ राऊळ व कु. सार्थक मालवणकर यांनी प्रथम श्रेणी तर, कु. आदित्य मेथर याने द्वितीय श्रेणी, इयत्ता ५ वी मधील कु. भुवन दळवी याने विशेष योग्यता श्रेणी, इयत्ता ६ वी मधील कु. तनिष्क निर्मले याने द्वितीय श्रेणी, इयत्ता ४ थी मधील प्रजय सावंत याने प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच हार्मोनियम प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ५ वी मधील कु. ऋतुजा पेडणेकर हिने प्रथम श्रेणी पटकावली. त्याचप्रमाणे, बासरी प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ६ वी मधील कु. अस्मि प्रभू तेंडोलकर, कु. अस्मि सावंत, कु. स्पृहा आरोंदेकार यांनी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली. सदर, विद्यार्थ्यांंना शाळेचे संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी, श्री. भगवान काळसेकर व श्री. अतुल उमळकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कौतुक केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page