भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून अभिषेक नाईक उपस्थित होते.

दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व तसेच योगासनांचे विविध प्रकार जसे की ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, मयुरासन, कपालभाती ,अनुलोम विलोम, पद्मासन, वज्रासन अशा विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक नाईक यांनी करून दाखवले. तसेच योगाद्वारे सर्वांगीण विकास साधता येतो असेही विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता प्राणायाम या योगप्रकाराने करण्यात आली.

You cannot copy content of this page