घर जळालेल्या तोडणकर कुटुंबियांना मातृत्व आधार फाउंडेशनकडून मदतीचा हात…

⚡मालवण ता.२०-: मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याने मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने तोडणकर कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेच्या सदस्यांनी जमा केलेली ११ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत गिरीजा तोडणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

काही दिवसापूर्वी वायरी येथील तोडणकर कुटुंबाला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले होते. तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर हे विक्रमचे सख्खे भावोजी आहेत. त्या दुःखात असतानाच विक्रम तोडणकर यांच्या घराला शॉर्टसर्किट मुळे आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाले होते. यात नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारी मातृत्व आधार यांनी आपल्या सर्व परिवाराला मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला. यात तातडीची मदत म्हणून ११ हजार १०० रुपयांची मदत विक्रम यांची आई गिरिजा तोडणकर हिच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, फॅनी फर्नांडिस, मार्शल फर्नांडिस, निशाकांत तोडणकर, उन्नती तोडणकर, नेहा तोडणकर, सचिन आडकर हे उपस्थित होते. यासाठी मदत केलेल्या सर्वांचे संतोष लुडबे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page