परीट समाजातर्फे लज्जिता दिलीप भालेकर हिचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२०-: देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात शिकत असणाऱ्या लज्जिता दिलीप भालेकर हिने महाविद्यालयातून व जिल्ह्यातूनही दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकरही उपस्थित होते. लज्जिता भालेकर हिने मुंबई विद्यापीठाची बी. एम. एस. (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) ही पदवी प्राप्त केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र भालेकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, योगेश आरोलकर, दयानंद रेडकर, किरण वाडकर, सुरेंद्र कासकर, प्रदिप भालेकर, मा. नगरसेविका दिपाली भालेकर, जय भालेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page