मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे पाच गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

नेमळे,हरिजनवाडी येथील हातावरील शस्त्रक्रिया झालेल्या रमावती नेमळेकर,असनिये येथील ह्रदयरोगाने ग्रस्त वैशाली सावंत, उच्चरक्तदाब आणि सांधेदुखीने त्रस्त केदार कोळपते आणि कानू कोलते, सावंतवाडी येथील सांधेदुखी आजाराने पिडीत राधिका मडकईकर अशा पाच गरजू रुग्णांना हे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत.

पुढील काळात आर्थिक परिस्थितीने ग्रासलेल्या आणि औषधोपचार न परवडणाऱ्या अनेकांना सामंत ट्रस्ट तर्फे मदत करण्यात येईल असे आश्वासन डॉ जयेंद्र परुळेकर यांनी दिले.

You cannot copy content of this page