“मल्टीस्पेशालिटी” हॉस्पिटल नको, आहे ते हॉस्पिटल सुधारा…

जयेंद्र परुळेकर यांची केसरकरांवर टीका: सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन कोणासाठी थांबले..?

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयातील हॉस्पिटलच्या प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याची भाषा करण्यापेक्षा आहे त्या हॉस्पिटला चांगल्या सुविधा द्या अशी टीका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली.

दरम्यान सिटीस्कॅन मशीन आणून तीन महिने झाले मात्र त्याचा उद्घाटन का केलं गेलं नाही अशी कोण व्यक्ती आहे ज्याच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी केसरकर वाट पाहत आहेत व्यक्ति मत्त्वाचं की जनता असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page