डेगवे येथे १ मे रोजी अखेरची अंगाई नाट्यप्रयोगाचे आयोजन…

⚡बांदा ता.२०-: डेगवे येथील श्री देवी माऊलीच्या जागृती दिनानिमित्त बुधवार दिनांक १ मे रोजी रात्री ठीक ९ वाजता श्री स्थापेश्वर कला क्रीडा मंडळ डेगवे निर्मित ‘अखेरची अंगाई’ या तीन अंकी नाट्यप्रयोगाचे श्री देवी माऊली मंदिर रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचे लेखन सचिन फुटक यांनी केले असून दिग्दर्शन एस. व्ही. नाईक यांनी केले आहे. या नाटकात स्थानिक कलाकार भीमसेन देसाई, प्रकाश देसाई, विनय देसाई, गजानन देसाई, अनिल देसाई, सुमेध देसाई, वैभव देसाई, दादा देसाई, सौ. धनश्री देसाई, सौ. शोभा मांजरेकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.
नाटकाचे सहाय्यक दिग्दर्शन उत्तम देसाई, निर्मिती सहाय्यक म्हणून दादा देसाई व आबाजी सावंत, सूत्रधार म्हणून सचिन देसाई व साई देसाई, नेपथ्य व प्रकाश योजना प्रथमेश रंगमंच मळगाव, पार्श्वसांगित महेंद्र मांजरेकर, ध्वनी संकलन अविनाश सावंत, रंगभूषा उमेश कोंडये, वेशभूषा संदीप देसाई व विनायक केसरकर, छायाचित्रण प्रमोद कळंगुटकर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. नाट्य रसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन डेगवे ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page