⚡कणकवली ता.२०-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेचा वार्षिक दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार 21 एप्रिलला सकाळी 10 वा. मराठा मंडळ हाॅल येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समितीच्या महिला आघाडीच्या कणकवली तालुकाध्यक्षा नेहा मोरे या असणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटक समितीचे राज्य सचिव राजन कोरगावकर हे आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सचिव तुषार आरोसकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, शिक्षक नेत्या सुरेखा कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, सचिव वैभवी कसालकर, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष नारायण नाईक, संचालिका ऋजुजा जंगले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वा. सोहळ्याचे उद्घाटन, मान्यवरांचे स्वागत, सत्कार, प्रास्ताविक, 11 वा. दत्तक विद्यार्थी कार्यक्रम, 11.30 वा. प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन, 12 वा. विद्यार्थी गुणगौरव सोहळा, 12.30 वा. मान्यवरांचे मनोगत, 1 वा. पुरस्कार प्राप्त शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान, 1.30 वा. अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर सोहळ्याची सांगता होईल. तरी या सोहळ्याला समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर, सचिव संतोष कांबळे, महिला आघाडीच्या सचिव विनिता शिरसाट यांनी केले आहे.
