कुडाळ :
रिक्षा युनियन चालक मालक संघटना कुडाळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवजयंती निमित्त कुडाळ गांधीचौक येथील श्री कोटेश्वर मंदिर येथे गुरूवारी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
रिक्षा युनियनच्या वतीने विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापुजा, महाआरती, महाप्रसाद व दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. भाजप रिक्षा युनियन तालुका अध्यक्ष अविनाश पाटील,कुडाळ उप नगराध्यक्ष व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुका रिक्षा युनियन प्रमुख किरण शिंदे, महेंद्र वेंगुर्लेकर, शिवसेना कुडाळ शहर रिक्षा युनियन अध्यक्ष नागेश जळवी, विलास वराडकर, मनिष सडवेलकर, अरुण गोसावी, रवि जाधव, दादा तवटे, दिपक जळवी, बाळा सुफल, सतिश भोगटे, अमित नरसे, संजय कुडाळकर, बाबल कुडाळकर, राजन वारंग, बाबी वारंग, उमेश जळवी, अरुण पावसकर, बाळा पावसकर, परशुराम कुंभार, उत्तम नेवाळकर, दत्ता रेवंडकर, राजेंद्र जाधव, राजन तुपट व सर्व रिक्षा चालक मालक उपस्थित होते.
सोबत फोटो
