आंबोलीत राजे प्रतिष्ठान तर्फे २७ आणि २८ ला शिवजयंती उत्सव कार्यक्रम सोहळा…

आंबोली,ता.२५: राजे प्रतिष्ठान कामतवाडी आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा २७ आणि २८ मार्च रोजी तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. याठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार असुन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष उल्हास गावडे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक,कामतवाडी आंबोली येथे शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राजे प्रतिष्ठान ने केले आहे.

या ठिकाणी २७ तारीखला सकाळी ९ वाजता कलश पूजन आणि मिरवणूक,मूर्ती अभिषेक,मूर्ती प्रतिष्ठापना.२८ तारीखला सकाळी ६ वाजता शिवज्योत आगमन,९ वाजता मूर्ती अनावरण,मूर्ती पूजन,मानवंदना,लेझीम प्रात्यक्षिक,ऐतिहासिक चित्र प्रदर्शन,शालेय विद्यार्थी कार्यक्रम, सत्कार समारंभ,मनोगते,शिवव्याख्यान, स्नेहभोजन,पालखी सोहळा असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.याठिकाणी धनगरी नृत्य,पारंपरिक सनई वादन,लेझीम पथक,घुमटवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण,प्रमुख अतिथी दीपक केसरकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. संदीप गावडे( माजी पंचायत समिती सदस्य) आमदार वैभव नाईक, शैलेश परब,राजन तेली,लखमराजे भोसले,महेश सारंग,संजू परब,सरपंच सावित्री पालेकर,गावकर श्रीकांत गावडे, शशीकांत गावडे, प्रकाश गावडे, केंद्रप्रमुख रामा गावडे, चौकुळ सरपंच बाबू शेटवे, गेळे सरपंच सागर ढोकरे,कानूर सरपंच देवेंद्र नार्वेकर,अवदूतानंद महाराज,परमानंद महाराज स्वामी समर्थ मठ हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते प्राध्यापक रुपेश पाटील याना निमंत्रित केले आहे.

You cannot copy content of this page