⚡बांदा ता.२३-: श्री साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त बुधवार २७ मार्च रोजी इन्सुली( रमेश नाटेकर यांच्या घराजवळील) येथील साटम महाराज मठ येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता लघुरुद्र, श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्री ठीक १०वाजता श्री देव कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर यांचा व्यंकटेश पद्मावती हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाटेकर कुटुंबीय व ग्रामस्थांनी केले आहे.
साटम महाराज मठ येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
