⚡कणकवली ता.२१-: ठाकरे शिवसेना गटाला कणकवली शहरात मोठा धक्का बसला असून कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी तडकाफडकी ठाकरे सेनेला सोडचिट्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली शहरप्रमुख मसुरकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणूकीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मागील 3 महिने आपल्याशी संपर्कच केला नसल्याची खंत मसुरकर यांनी व्यक्त केली. तसेच आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे जनतेची कामे नेली असता त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप मसुरकर यांनी केला. पक्षसंघटनेत माझ्या स्टाईल ने मला काम करायला देत नव्हते. काही बोलायला गेलो की मला बोलू देत नव्हते, माझी मुस्कटदाबी केली जात होती असा आरोपही मसुरकर यांनी केला. शिवसेना जिल्हा खजिनदार भास्कर राणे, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी प्रमोदशेठ मसुरकर यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शहरप्रमुख बाळू पारकर, युवासेना तालुकाप्रमुख निलेश तेली, कलमठ शहरप्रमुख प्रशांत वनस्कर, मारुती सावंत, चिन्मय रावराणे आदी उपस्थित होते.
ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…
