आपलं सरकार पोर्टल वर दाखले न मिळाल्यास १ एप्रिलला एप्रिल फुल आंदोलन…

सतिश सावंत : महायुती सरकारने मराठा आरक्षणचे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची दिशाभूल..

⚡कणकवली ता.२०-: सध्या राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. सिंधुदुर्गात पोलीस भरतीसाठीच्या उमेदवाराना नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही आहे. येत्या दोन दिवसांत आपलं सरकार पोर्टल वर हे दाखले न मिळाल्यास आचारसंहिता काळात मोर्चे आंदोलन करता येत नसले तरी १ एप्रिल ला सरकार विरोधात एप्रिल फुल आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.

येथील ठाकरे शिवसेना कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रवी गावडे उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, महाराष्ट्र सरकारने २६ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र आपलं सरकार पोर्टल वर मराठा समाजातील उमेदवारांना मराठा समाज आरक्षण लाभ मिळवून देणारा दाखला मिळत नाही आहे. मराठा आरक्षणचे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची दिशाभूल महायुती सरकारने केली असल्याची टीका श्री. सावंत यांनी केली. पोलीसभरती साठी ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे. आरक्षण चा लाभ मिळण्यासाठी नॉन क्रिमिलेअर चा दाखलाही मिळत नाही आहे. खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कुडाळ व सावंतवाडी भागात आवश्यक नॉन क्रिमिलेअर दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दखल घेत तात्काळ आपलं सरकार पोर्टल वर आरक्षणचा लाभ मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page