लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन…

⚡वैभववाडी ता.२०-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन करण्यात आले. पोलीस ठाणे ते दत्तमंदीर असं पोलीसांनी संचलन केले. संभाजी चौकामध्ये दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले.


   नुकतीच लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून  त्याची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रुट मार्च व शक्ती प्रदर्शन व संभाजी चौकात मॉक ड्रील करण्यात आले.
   या संचलनात सपोनि. सुनिल अवसरमोल, पोउनि अमोल पाटील, दंगल नियंत्रण पथक व वैभववाडी पोलीस ठाणेतील अंमलदार सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page